There was an error in this gadget
There was an error in this gadget

Search AbideInSelf

Total Pageviews

Saturday, March 27, 2010

निशब्द

शब्दांचे हार आणि शब्दांचेच तुरे,
निशब्दासाठी पडतात सर्वच अपुरे !

शब्दांचेच प्रश्न आणि शब्दांतलीच उत्तरे,
निशब्दासाठी खेळ आहेत सारी ‘प्रश्न आणि उत्तरे’ !

शब्दांच्या पतंगाला शब्दांचाच दोरा,
आकाशाला जरी भिडला तरी कोराच्या कोरा !

शब्दांच्या किनार्‍यावर वाहते आहे शब्दांचीच नांव,
कसा कळेल तिला कधी निशब्दाचा ठांव !

शब्द म्हणजे आहे प्राणाची भाषा,
प्राणाच्या जाणत्याला मात्र कसलीच नाही आशा !

शब्दांच्या गाद्या आणि शब्दांचेच लोड,
"स्वस्थ" वाटत नाहीये ना..मग आता तरी सोड !

शब्दाला शब्द जोडून का घालवतोस वेळ व्यर्थ,
शब्दाला कधी का असतो स्वतःचा असा अर्थ !!

शब्दांचा बाजार शब्दांचाच खेळ,
निशब्दाला 'जाण', वाया चाललांय वेळ !

शब्दांची बंधने आणि शब्दांवरील भक्ती,
मिळाली आहे कारे तुला व्यर्थ धारणांमधून मुक्ती??

शब्दांची वळणे आणि शब्दांच्याच वाटा,
"स्वगृहा"पासून लांब लांब नेतात ह्या वाटा !

शब्दांचा संग आणि शब्दांचेच रंग,
शब्दांच्या 'अलिकडचा' आहे निशब्दाचा संग !

शब्दांच्या कवायतीमधील शब्दांचेच श्रम,
जाणून घेरे तू.... ब्रह्म म्हणजे भ्रम !!

शब्दांचे पांडीत्य आणि शब्दांचाच बाजार,
"निराधार" आहेस "तो" तू, जो सार्‍या ब्रम्हांडाचा आधार !

शब्दांचा प्रभाव आणि भावाचा अभाव,
कसा कळेल रे तुला तुझा मूळ "स्व"भाव ??

शब्दातील तुझा "मी", शब्दातील तुझा "तू"...
सदगुरु कृपेने कळेल... जाणीवेचा “जाणता” तो खरा “तू” !!

! जय गुरु !

सप्रेम शुभेच्छा

नितीन राम 
२६ मार्च २०१०

www.abideinself.blogspot.com
Whatever the Question, Love is the Answer!

English translation of this post:
Nishabda-TheWordless
http://abideinself.blogspot.in/2010/11/nishabda-wordless.html

++++++++++++++++++++++++++++++++++

अजून काही स्फुट-लेख:
बंधू ... तुला रे कसला मृत्यू...!: http://abideinself.blogspot.in/2010/09/blog-post_05.html
प्रेम रोख... संशय उधार!: http://abideinself.blogspot.in/2011/06/blog-post.html 
श्रद्धा हरवली आहे का हो..!: http://abideinself.blogspot.in/2011/05/blog-post_131.html
'शब्दा'ला दिसेल फक्त 'शब्द': http://abideinself.blogspot.in/2011/05/blog-post_23.html
"शब्दा"चे विसर्जन---तोच "निशब्द": http://abideinself.blogspot.in/2010/07/blog-post_06.html
"सत्य" ...स्वयंप्रकाशीत आहे: http://abideinself.blogspot.in/2011/08/blog-post.html